आपण भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवू शकतो. आपण भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवू.
मला पूर्ण विश्वास आहे की, नियमांचे पालन करत आपण करोनाशी लढू आणि पुढेही जाऊ. असे म्हटले गेलेय की, सर्वम आत्मवशं सुखम. म्हणजे जे आपल्या कब्जात आहे, नियंत्रणात आहे, तेच सुख आहे. आत्मनिर्भरता आपल्याला सुख आणि दिलासा देण्यासोबतच समर्थही करते. २१व्या शतकाला भारताचे शतक बनवण्याचा आपला संकल्प ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पातूनच पूर्ण होईल. याला १३० कोटी देशवासीयांच्या प्राणशक्तीतूनच ऊर्जा मिळेल.......